बºहाणपूर शहरात कोरोनाचे आणखी १६ पॉझिटिव्ह अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 02:43 PM2020-05-04T14:43:04+5:302020-05-04T14:45:27+5:30
बºहाणपूर शहरातील बाधित रूग्णांची संख्या ३५ वर पोहोचली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बºहाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : आखाती राष्ट्रातील हजहून आलेल्या दाऊदपुरा भागातील माजी नगरसेवकाने बºहाणपूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढवल्याने रविवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालातील ११६ पैकी १६ संशयित रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे आता बºहाणपूर शहरातील बाधित रूग्णांची संख्या ३५ वर पोहोचली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बºहाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे. संशयित रुग्णांचे विलगीकरण करून तातडीने चाचणी करण्याबाबत कर्तव्यात हयगय केली म्हणून बºहाणपूरचे जिल्हाधिकारी राजेशकुमार कौल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. रिक्त पदावर शिवनी येथून जिल्हाधिकारी प्रवीणसिंह यांनी रविवारी रात्री पदभार स्वीकारला असून, त्यांनी बºहाणपूरच्या संचारबंदीत २४ तासांची मुदतवाढ दिली आहे.
बºहाणपूर शहरातील दाऊदपुरा भागातील माजी नगरसेवकाच्या संपर्कातील १८ कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील आणखी १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातूनच बºहाणपूर शहरातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत ४१० जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवली असता, २८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. पॉझिटिव्ह आलेल्या ३५ पैकी दोन जण मयत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रूग्णात जैनाबाद येथील एका डॉक्टरचा व ७४ वर्षीय वृध्दाचा समावेश असला तरी उर्वरित मात्र तिशीतील तथा चाळीशीतील तरूण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बºहाणपूर शहरातील जैनाबाद, इंदिरा कॉलनी, सागर टॉवर लालबाग, मोमीनपुरा, अख्तर कॉलनी मोमीनपुरा, सुभाष हॉस्पिटल, न्यूू इंदिरा कॉलनी, पाटीदार कॉलनी सिंधीपुरा या भागात या नव्याने आढळून आलेल्या रू्ग्णांचा समावेश आहे. हा भाग प्रतिबंधक क्षेत्र घोषित करून बाधित रूग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करून तथा या प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांंद्वारे सर्व्हेक्षण मोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, ग्रीन झोनचे वरकरणी चित्र रंगवताना शहरात कोरोनाने घर केल्याने सर्व्हेक्षणात व संशयित रुग्णांच्या तपासणीत हयगय झाल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राजेशकुमार कौल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर जिल्हाधिकारी प्रवीणसिंह यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांनी २४ तास संचारबंदीत वाढ केली आहे.
दरम्यान, इंदूर विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक तोमरसिंह यांनी बºहाणपूर शहरात तळ ठोकून आहेत. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात पथसंचलन करून कोरोनाविरूध्द लढण्याचा सल्ला दिला आहे.