जळगाव जिल्ह्यात आणखी 30 कोरोना बाधीत, जळगाव शहरात रुग्णांचीशंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:33 PM2020-05-21T18:33:54+5:302020-05-21T18:34:06+5:30
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव , एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 108 व्यक्तींचे तपासणी ...
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 78 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील सव्वीस, भुसवाळ येथील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 381 इतकी झाली असून आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.