आणखी ७६ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 06:34 PM2020-06-15T18:34:07+5:302020-06-15T18:34:19+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा नवीन ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा २३, जळगाव शहर १४, भुसावळ, रावेर, पारोळा प्रत्येकी ०७, एरंडोल ०५, यावल ०४, धरणगाव व मुक्ताईनगर प्रत्येकी ०३ तसेच अमळनेर, जामनेर आणि जळगाव ग्रामीण प्रत्येकी ०१रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८०४ इतकी झाली आहे.
अशी आहे बाधितांची संख्या
जळगाव शहर - ३२२
भुसावळ - ३१७
अमळनेर - २२९
चोपडा- १४१
रावेर - १३३
यावल - ९६
भडगाव - ९३
पारोळा- ९३
धरणगाव - ८८
जामनेर - ८४
जळगाव ग्रामीण- ५६
एरंडोल - ५६
पाचोरा- ४३
चाळीसगाव - १८
मुक्ताईनगर -१५
बोदवड- १४
बाहेरील जिल्ह्यातील- ०६