यावल दरोडाप्रकरणी आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:21+5:302021-07-19T04:12:21+5:30
भुसावळ : यावलला मुख्य बाजारपेठेतील बाजीराव कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत मास्टर माईंड मुकेश ...
भुसावळ : यावलला मुख्य बाजारपेठेतील बाजीराव कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत मास्टर माईंड मुकेश प्रकाश भालेरावसह चार आरोपींना अटक झाली असतानाच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाचवा आरोपी रुपेश ऊर्फ भनभन अशोक चौधरी (४१, रा. श्रीराम नगर, भुसावळ)
यास रविवारी पहाटे ताब्यात घेतले आहे.
यावलमधील दरोड्याप्रकरणी आतापर्यंत निवृत्ती ऊर्फ शिवा हरी गायकवाड (३२, रा. रामनगर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद ह.मु.कांदीवली पूर्व मुंबई) तसेच यश विजय अडकमोल (२२, रा.बोरावल गेट, यावल), चंद्रकांत ऊर्फ विकी सोमनाथ चाले (रा.मोहित नगर, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली होती तर शनिवारी मुकेश भालेराव (भुसावळ) याच्या अटकेनंतर रविवारी पहाटे रुपेश ऊर्फ भनभन अशोक चौधरी (४१), श्रीरामनगर, भुसावळ यास अटक करण्यात आली. एकूण अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली असून या गुन्ह्यात सुनील अमरसिंग बारेला (रा.गोऱ्यापाडा, ता.चोपडा) हा पोलिसांना वॉण्टेड आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,
बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या
मार्गदर्शनाखाली रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्रीकृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बिऱ्हाडे आदींच्या पथकाने आरोपीच्या भुसावळातील श्रीराम नगर भागातून मुसक्या आवळल्या. आरोपीला एएसआय मुजफ्फर खान समशेर खान यांच्या ताब्यात देण्यात आले.