अन् प्रयास मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 09:24 PM2019-09-13T21:24:28+5:302019-09-13T21:25:28+5:30
जळगाव - मिरवणुकीत सहभागी होण्याबाबतची परवानगी नसताना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आग्रह धरून पोलीस प्रशासनाच्या विरूध्द घोषणाबाजी करून जमाव जमविल्यानंतर ...
जळगाव- मिरवणुकीत सहभागी होण्याबाबतची परवानगी नसताना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आग्रह धरून पोलीस प्रशासनाच्या विरूध्द घोषणाबाजी करून जमाव जमविल्यानंतर गणेशमूर्ती महामार्गावरून थांबवून वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पिंप्राळा येथील प्रयास मित्र मंडळाच्या अध्यक्ष विकास चौधरी याच्यासह आठ ते दहा जणांविरू ध्द शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पिंप्राळा येथील प्रयास मित्र मंडळ बुधवारी रात्री गणेशमूर्तीसह महामार्गावरून विसर्जन मिरवणुकीत क्रमांक लावण्यासाठी जात होते़ परंतू, वाटेतच पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना थांबवून मिरवणुकीत सहभागी होण्याबाबतची परवानगी आहे का? अशी विचारणा केली होती़ मात्र, परवानगी मिळाली नसल्याचे कारण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले़ त्यानंतर कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभागी होण्याबाबत पोलिसांना आग्रह धरला़ परंतू, परवानगी नसल्यामुळे पोलिसांकडून नकार देण्यात आला़ त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिवकॉलनी स्टॉपजवळ गणेशमूर्ती थांबवून रस्त्यावरच ठिय्या मांडला व पोलीस प्रशासनाविरूध्द घोषणाबाजी करित जमाव जमविला़ याप्रसंगी रामानंद पोलीस ठाण्याती ल पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर, कांचन काळे, सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, प्रमोद पाटील, रवींद्र पाटील, राकेश दुसाने, विनोद सोनवणे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजविण्याचे प्रयत्न केले़ परंतू, कार्यकर्त्यांकडून मूर्ती रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला व जमाव जमविला़ त्यामुळे अखेर शुक्रवारी पोलीस कॉन्सटेबर हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून प्रयास मित्र मंडळाचा अध्यक्ष विकास चौधरी व त्याचा मित्र नितीन (पुर्ण नाव माहित नाही) व सोबत आठ ते दहा जण यांच्याविरूध्द भादवी कलम १४३, १४५, १४९, ३४१, २८३, १८८ तसेच पोलीस कायदा कलम ३३ (एन) चे उल्लंघन १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़