राज्यमंत्र्यांच्या पुत्राविरुद्ध दोन दिवसात दुसरा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:18 PM2019-10-23T12:18:15+5:302019-10-23T12:19:39+5:30
पाळधी ता.धरणगाव : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सेना उमेदवाराचा प्रचार केला, म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ...
पाळधी ता.धरणगाव : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सेना उमेदवाराचा प्रचार केला, म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह अन्य दोन जणांविरुध्द दि.२१ च्या रात्री पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप पाटील यांच्यावर दोन दिवसातील हा दुसरा गुन्हा आहे.
सहकार राज्यमंत्र्यांचे गाव असलेल्या पाळधी येथे २१ रोजी मतदान झाले. मतदान सुरु असतांना संध्याकाळी ५-१५ ते ५-३० या कालावधीत प्रताप पाटील हे अन्य दोन कार्यकर्ते झवर विद्यालयातील मतदान केंद्रात आले व तिथे त्यांनी सेना उमेदवाराचा प्रचार केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे बापू गंगाधर रोहोम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. एच. एल.गायकवाड व सपोनि पवन पी.देसले हे अधिक तपास करीत आहेत.