कोविड रुग्णालयातील डॉ़ डांगे यांचा आणखी एक प्रताप, खुर्चीवर बसून पसरविले टेबलावर पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:52 PM2020-09-27T12:52:27+5:302020-09-27T12:52:47+5:30
पोलिसांत तक्रार
जळगाव : काही महिन्यांपूर्वी थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर बसून आपण डिन असल्याचे सांगणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ़ चंद्रशेखर डांगे यांनी पुन्हा एक नवीन प्रताप केला व यावेळी अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी मात्र, थेट पोलिसांत तक्रारी दिली़
घडले असे की, अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद हे रुग्णालयात तपासणी करून सकाळी दहा वजता आपल्या दालनात येऊन बसले होते़ त्यानंतर डॉ़ चंद्रशेखर डांगे हे थेट बर्मुडा व टिशर्टवर आत आले व थेट डॉ़ रामानंद यांच्या खुर्चीजवळच्या खुर्चीतच बसले व बडबडू लागले़ त्यांना समजविण्याचा प्रयत्न झाला मात्र, त्यांनी ऐकले नाही़ त्यामुळे डॉ़ रामानंद यांनी काही कर्मचाºयांसह आहे तशाच परिस्थिीत थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले़ डॉ़ डांगे विरोधात तक्रार दाखल केली़ यावेळी स्वच्छता निरीक्षक बापू बगलाणी उपस्थित होते़ दरम्यान, डॉ़ डांगेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे़
आधीच तक्रार करायला हवी होती
डॉ़ डांगे हे एक नव्हे तर दोन वेळेस थेट डीनच्या खुर्चीवर बसले होते़ ऐवढे नव्हे तर पाय कधी टेबलवर तर कधी खिडकीला लावून ते बसायचे येणाºया जाणाºयाला आपण डीन असल्याचे सांगायचे, त्यांच्या या प्रकाराबाबत शासनाकडे त्यांचा अहवाल पाठविण्यात आला होता़ मात्र, कारवाईच झाली नव्हती, त्यामुळे पुन्हा ते रविवारी थेट डीन कॅबीनलाच पोहोचले़ त्यामुळे त्यांच्यावर आधीच गुन्हा दाखल केला गेला पाहिजे होता, असे अधिष्ठाता डॉ़ रामानंद म्हणाले़