दिल्लीतून आणखी एका ठगाला घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:58+5:302021-06-23T04:12:58+5:30

फोटो... जळगाव : म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विकास सुरिंदर कपूर (रा. दिल्ली) ...

Another swindler was arrested from Delhi | दिल्लीतून आणखी एका ठगाला घेतले ताब्यात

दिल्लीतून आणखी एका ठगाला घेतले ताब्यात

Next

फोटो...

जळगाव : म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विकास सुरिंदर कपूर (रा. दिल्ली) याचा साथीदार सचिन रा. गुप्ता (दिल्ली) याला जळगाव पोलिसांनी सोमवारी दिल्लीतून ताब्यात घेतले. दरम्यान, कपूर याच्या घराची पथकाने झडती घेतली. या घरझडतीत गुन्ह्यात वापरलेले दोन लॅपटॉप, हार्डडिस्क जप्त करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

सायबर ठगांनी वामन काशिराम महाजन (रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) या शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी कपूर याला दिल्लीतून अटक केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व उपनिरीक्षक संदीप पाटील यांचे दोन पथक दिल्लीत दाखल झाले आहे.

दाणाबाजारात वृद्धाचा मृतदेह आढळला

जळगाव : दाणाबाजारातील हनुमान मंदिरानजीक राजेंद्र जगन्नाथ मिसर (वय ६०, रा. पारोळा) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. शहर पोलीस ठाण्याचे उमेश भांडारकर यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास रईस शेख करीत आहेत.

शेती सोडण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार

जळगाव : कुसुंबा शिवारातील आपल्या मालकीची शेती गट क्र. २६६/२ अ याचा ताबा सोडावा म्हणून कुसुंबा व धानवड (ता. जळगाव) येथील काही लोकांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार मानसिंग भगवान पाटील व भगवान पुंजू पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी भगवान गजमल पाटील यांच्यासह नऊ जणांच्या नावांचा उल्लेख केला आहे.

Web Title: Another swindler was arrested from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.