गितांजली केमिकल्समधील दुस-या कामगाराचीही प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:56 PM2017-11-02T12:56:07+5:302017-11-02T12:58:26+5:30

अंगावर गरम केमिकल्स पडून भाजून गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बळीराम तिवनकर (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या कामगाराचा गुरुवारी पहाटे २. ४० वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. दरम्यान, तिवनकर यांच्या वारसांना मदत व ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दरम्यान,संभाव्य वाद लक्षात घेता कंपनी प्रशासनाने नियमानुसार मदत व मुलास कायमस्वरुपी नोकरी देण्याचे लेखी दिल्याने नातेवाईकांचा रोष कमी झाला.  

Another worker from Gitanjali Chemicals also got the product | गितांजली केमिकल्समधील दुस-या कामगाराचीही प्राणज्योत मालवली

गितांजली केमिकल्समधील दुस-या कामगाराचीही प्राणज्योत मालवली

Next
ठळक मुद्देठोस आश्वासन व मदतीसाठी नातेवाईक आक्रमक मुलाला कायमस्वरुपी नोकरीचे दिले लेखी आश्वासन पोलिसांनी मध्यस्थी करुन मिटविला वाद


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २ : अंगावर गरम केमिकल्स पडून भाजून गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बळीराम तिवनकर (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या कामगाराचा गुरुवारी पहाटे २. ४० वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. दरम्यान, तिवनकर यांच्या वारसांना मदत व ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दरम्यान,संभाव्य वाद लक्षात घेता कंपनी प्रशासनाने नियमानुसार मदत व मुलास कायमस्वरुपी नोकरी देण्याचे लेखी दिल्याने नातेवाईकांचा रोष कमी झाला.  
आठवडाभरातील दुसरा मृत्यू
एमआयडीसीतल गितांजली केमिकल्स या कंपनीत सुनील चिंतामण चौधरी (वय २७, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव मुळ रा.उदळी, ता.रावेर)व प्रकाश बळीराम तिवनकर (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव, मुळ रा.साकेगाव, ता.भुसावळ) हे दोन्ही जण २६ आॅक्टोबर रोजी सकाळ सत्रात कामाला होते. उत्पादन विभागात काम सुरु असताना सकाळी दहा वाजता वरच्या माळ्यातील लूक रिअ‍ॅक्टरमधील गॅसचा पाईप फाटला व त्यातून गरम केमिकल्स सुनील व प्रकाश यांच्या अंगावर पडले. या घटनेत दोन्ही जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना २८ रोजी रात्री सव्वा दहा वाजता सुनील याचा मृत्यू झाला, तर प्रकाश यांची मृत्यूशी झुंज सुरुच होती. गुरुवारी पहाटे २.४० वाजता त्यांचा श्वास थांबला.

Web Title: Another worker from Gitanjali Chemicals also got the product

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.