वाकोद खून प्रकरणात रोटवद येथील दुसऱ्या युवकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:27 PM2021-01-04T16:27:30+5:302021-01-04T16:31:18+5:30
वाकोद खूनप्रकरणात पुन्हा रोटवद ता. जामनेर येथील युवकाला पहूर पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : वाकोद खूनप्रकरणात पुन्हा रोटवद ता. जामनेर येथील युवकाला पहूर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन चौकशीअंती रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची कारवाई केली आहे. घटनेतील संख्या सहावर पोहोचली आहे.
वाकोद खूनप्रकरणात योगेश आस्कर, अभिजित पाटील यांना अटक झाली. त्यांच्यानंतर पवन देशमुख रोटवद याला अटक झाली. त्याच्या चौकशीदरम्यान मनसिराम धारासिंग बारेला अटक झाली. यासोबतच अल्पवयीन मजुराला पोलिसांनी अटक करून बालसुधारगृहात जळगाव येथे रवाना केले आहे.
या तपासातून रोटवद येथील सहावा पवन मंगू राठोड (३२) या युवकाला पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे, पोलीस कर्मचारी भरत लिंगायत, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर देशमुख व गायकवाड यांनी सोमवारी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली आहे. योगेश, अभिजित व पवन या तिघांसह मनसिराम धारासिंग बारेला हा पोलीस कोठडीत आहे. त्याची मुदत सोमवारी संपल्याने सोमवारी जामनेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चारही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून योगेश,अभिजित व पवन या तिघांना तिसऱ्यांदा पोलीस कोठडीत रवानगीचे आदेश मिळाले आहे.