शासनाच्या कट प्रॅक्टीस विरोधी कायदा मसुदा समितीवर डॉ. उज्वला देवरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:40 PM2017-08-22T13:40:49+5:302017-08-22T13:42:24+5:30

राज्यातील एकुण 11 डॉक्टरांचा समावेश

The anti-corruption laws of the government draft committee Ujwala Deore's selection | शासनाच्या कट प्रॅक्टीस विरोधी कायदा मसुदा समितीवर डॉ. उज्वला देवरे यांची निवड

शासनाच्या कट प्रॅक्टीस विरोधी कायदा मसुदा समितीवर डॉ. उज्वला देवरे यांची निवड

Next
ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून डॉ. देवरे यांची एकमेव निवड समितीची पहिली बैठक 23 रोजी मुंबईत

चाळीसगाव दि.23- राज्य शासनाने वैद्यकीय कट प्रॅक्टीस विरोधी कायदा करण्यासाठी मसुदा समिती गठीत केली असून चाळीसगावच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. उज्वला जयवंतराव देवरे यांची उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून एकमेव निवड केली आहे. समितीत ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील एकुण 11 डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची पहिली बैठक बुधवारी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सभागृहात होईल. डॉ. उज्वला देवरे गेल्या 25 वषार्पासून चाळीसगाव तालुक्यात स्त्रीरोग तज्ञ  काम म्हणून  करीत आहे. डॉक्टरांच्या आयएएम संघटनेतही  त्यांनी काम केले असून रोटरी व इनरव्हील क्लबसह डॉ. देवरे फाऊंडेशन मार्फत अनेकविध सामाजिक आणि आरोग्यविषय उपक्रम त्या राबवित असतात. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांकडून त्यांना निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. कट प्रॅक्टीसमुळे वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य नष्ट होऊ पाहत असून रुग्णांच्या मन पटलावर डॉक्टरांची प्रतिमा मलिन होत आहे. शासनाने याविरोधी कायदा करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. आपण अभ्यासपुर्ण सुचना मसुद्यासाठी देणार असल्याचे डॉ. देवरे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. विविध संघटनांतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.

Web Title: The anti-corruption laws of the government draft committee Ujwala Deore's selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.