शेतकरी विरोधी अध्यादेश तात्काळ रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:02 PM2020-08-10T22:02:31+5:302020-08-10T22:02:42+5:30
जळगाव : पंतप्रधान यांनी शेतकरी विरोधी काढलेले अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवदेन लोक संघर्ष मोर्चातर्फे ...
जळगाव : पंतप्रधान यांनी शेतकरी विरोधी काढलेले अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवदेन लोक संघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील चोपडा, रावेर ,यावल , बोदवड , मुक्ताईनगर, अमळनेर, चाळीसगाव याठिकाणी सुध्दा शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना निवदेन दिले़
लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व सचिन धांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात भेट घेतली़ नंतर चर्चा करून मुख्यमंत्री यांचे नावे आणखी एक निवेदन देण्यात आले़ त्यात जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा मका तात्काळ खरेदी करण्यात यावा, खतांचा काळाबाजार तात्काळ थांबवावा, महाराष्ट्रातील सामुदायिक वन पट्टे धारकांना तात्काळ वन पट्टे मंजूर करून द्यावी, आदिवासींना तात्काळ खावटी अनुदान मंजूर करावे, ज्या वन जमीन धारकांना पट्टे मंजूर झाले आहेत, पण त्यांना कुठलेही कर्ज मिळत नाही अश्या सर्व दावेधारकांना तात्काळ विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद बनवून घेत त्यांना कर्ज वाटप करण्यात यावे आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या़ दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास गावा-गावात अभिनव आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही लोक संघर्ष मोर्चातर्फे देण्यात आला आहे़ यावेळी निवेदन देताना प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कर्डिले, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते़