जळगाव बस स्थानकात प्रत्येक प्रवाशाची होणार अँटीजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:57+5:302021-04-20T04:16:57+5:30
महापौरांनी केली पहाणी : पहिल्या दिवशी ७० जणांची केली चाचणी नेरी नाका स्मशानभूमी : गॅस दाहिनी किंवा लकडावरील अंत्यसंस्कारासाठीहीं ...
महापौरांनी केली पहाणी : पहिल्या दिवशी ७० जणांची केली चाचणी
नेरी नाका स्मशानभूमी : गॅस दाहिनी किंवा लकडावरील अंत्यसंस्कारासाठीहीं भरावे लागतेय शुल्क
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापौर व उप महापौरांनी सोमवारी जळगावतील नवीन बस स्थानकाची पाहणी करून, स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटीजन चाचणी करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बस स्थानकात अँटीजन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले असून, पहिल्या दिवशी ७० प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
सध्या संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाहेरील मार्गावरची सेवा बंद आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या इतरत्र ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची स्थानकात ये-जा सुरूच असते. त्यामुळे खबरदारी म्हणून बस स्थानकातही येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटीजन चाचणी करण्याबाबत महापौर जयश्री महाज यांनी मनपा आरोग्य विभागाला सूचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी सोमवारी सायंकाळी नविन बस स्थानकाला भेट देऊन, सध्या सुरू असलेल्या सेवेची व प्रवाशांची माहिती घेतली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, नीलेश पाटील, वाहतूक निरीक्षक मनोज तिवारी उपस्थित होते.
इन्फो :
दोन पथकांची नियुक्ती
मंगळवार पासून बस स्थानकात सकाळी आठ पासून सायंकाळी सहा पर्यंत स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी मनपा आरोग्य विभागातर्फे दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चाचणीत जे प्रवासी पॉझिटिव्ह आढळून येतील. त्यांना लागलीच कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.