भंगारमध्ये सापडले ॲन्टीक पीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:20+5:302020-12-07T04:11:20+5:30

जळगाव : कोविड रुग्णालयातीलच नव्हे परिसरातील सर्व भंगार शोधून बाहेर काढण्यात येत आहे. असेच भंगार शोधता शोधता कर्मचाऱ्यांना अगदी ...

Antique piece found in debris | भंगारमध्ये सापडले ॲन्टीक पीस

भंगारमध्ये सापडले ॲन्टीक पीस

Next

जळगाव : कोविड रुग्णालयातीलच नव्हे परिसरातील सर्व भंगार शोधून बाहेर काढण्यात येत आहे. असेच भंगार शोधता शोधता कर्मचाऱ्यांना अगदी जुने एक बाॅयलर मशिन सापडले असून याची रंगरंगाेटी करून रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शोभेतही भर पडणार आहे.

गेल्या महिनाभरापासून रुग्णालयातील भंगार बाहेर काढून एका ठिकाणी जमा केले जात आहे. अशाच प्रकारे प्रयोग शाळेच्या शेजारील एका खोलीत भंगार शोधता शोधात स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे यांना ही मशिन आढळून आली. मात्र, ही अत्यंत जुनी मशिन असून आताही तीचे लोखंड टणक आहे. मात्र, या मशिनला भंगारमध्ये न फेकता रुग्णालय परिसरातील रुग्णालया जवळ जागा करून कंपाऊंड आखून या मशिनला रंगरंगोटी करण्याचे काम रविवारी करण्यात आले.

दरम्यान, हे अत्यंत जुने बॉयलर असून यात कचरा जाळला जायचा, पाणी गरम केले जायचे, अशा ज्या काही जुन्या वस्तू सापडतील त्यांना चांगले करून रुग्णालय परिसरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. इम्रान पठाण यांनी दिली.

फोटो आहे.

Web Title: Antique piece found in debris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.