नाशिकच्या अनुष्काचा रामललासाठी पुष्पहार; PM मोदींनीही दिली कौतुकाची थाप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:55 AM2024-01-22T07:55:10+5:302024-01-22T07:55:20+5:30
‘फ्लावर आर्ट बाय अनुष्का’च्या संचालक असलेल्या अनुष्का नाशिक येथील विविध मंदिरात उत्सवासाठी पुष्पहार बनवून देत असते.
- संजय बी. सोनार
नगरदेवळा (जि. जळगाव) : अयोध्या येथे सोमवार, दि. २२ रोजी श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामललला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामललासाठी श्रीमाळ (पुष्पहार) नाशिक येथून रवाना झाली असून, ही श्रीमाळ अनुष्का पाटील व तिच्या तीन मैत्रिणींनी बनविली आहे. अनुष्का ही पाचोरा तालुक्यातील नगरदेवळ्याची नात आहे.
‘फ्लावर आर्ट बाय अनुष्का’च्या संचालक असलेल्या अनुष्का नाशिक येथील विविध मंदिरात उत्सवासाठी पुष्पहार बनवून देत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी वारकरी संप्रदाय व संस्थानतर्फे तुळशीहार अर्पण करून मोदी यांचे स्वागत करण्यात आले होते. हा पुष्पहार आवडल्याने व श्रीरामास चढविलेला फुलांचा आकर्षक साज पाहून मोदी यांनी कौतुकाची थापही दिली. यानंतर अयोध्या येथे श्री रामलललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पुष्पहार पाठविण्याचे कळविल्याने एक छान पुष्पहार श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तासोबत अयोध्येला पाठविण्यात आला.
आपण बनविलेला पुष्पहार रामललापर्यंत जाणार आहे. यासारखा जीवनात आनंद नाही. या पुष्पहाराचा निरोप मिळाल्यानंतर आपण स्वत:च भारावलो होतो. - अनुष्का पाटील