एमआयडीसीतील राखीव जागा सोडून नवीन भूसंपादनाचा अट्टाहास
By admin | Published: May 25, 2017 11:03 AM2017-05-25T11:03:33+5:302017-05-25T11:03:33+5:30
ट्रक टर्मिनसचा विषय : थोडय़ा पाठपुराव्यामुळे 7 एकर जागा मिळणे शक्य
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25- मनपाकडून ट्रक टर्मिनससाठी मनपाच्या वाढीव हद्दीच्या आराखडय़ात असोदा शिवारात आरक्षित केलेली जागा संपादित करण्याचा प्रय} सुरू आहे. मात्र ही बागायती जमीन असल्याने शेतक:यांचा त्यास तीव्रविरोध आहे. एमआयडीसीत ट्रक टर्मिनससाठीच तब्बल 30 हजार चौरस मीटर म्हणजे 7 एकर जागा आरक्षित असून ती अद्याप कुणासही दिलेली नाही. त्यामुळे मनपाने हीच जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे फायदेशिर ठरणार आहे. मात्र मनपाकडून त्याऐवजी भूसंपादनाचा अट्टाहास केला जात आहे.
मनपाने ट्रक टर्मिनससाठी 1999 मधील वाढीव हद्दीच्या विकास आराखडय़ानुसार मौजे असोदा येथील गट क्र.1214,1215, 1216, 1217,1219 वर आरक्षण क्र.227 टाकले आहे. या जागेपैकी काही जागा महामार्गासाठी संपादित झाली आहे. त्यामुळे मनपाला या जागेची मोजणी करून किती जागा शिल्लक राहते? याचा अंदाज घेऊन भूसंपादनाची कार्यवाही करावी लागणार आहे. त्यासाठी मनपाने भूमिअभिलेख विभागाकडे मोजणीसाठी पैसेही भरले आहेत.
या मोजणीसाठी 4 मार्च रोजी भूमिअभिलेखच्या अधिका:यांसोबत गेलेल्या मनपाच्या अधिका:यांना जागामालक शेतक:यांनी तीव्र विरोध केला. एका शेतक:याने तर अंगावर रॉकेल टाकून घेत पेटवून घेण्याची धमकी दिल्याने हे पथक रिकाम्या हाती परतले होते. त्यामुळे मंगळवार, 23 मे रोजी नगररचना विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात जागा मोजणीसाठी गेले. मात्र त्यास शेतक:यांनी पुन्हा तीव्र विरोध केला. त्यामुळे या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले.
एमआयडीसीत जागा आरक्षित
एमआयडीसीत एम-सेक्टरमध्ये एमएसईबी पॉवर स्टेशन शेजारी 30 हजार चौरस मीटर जागा म्हणजेच तब्बल 7 एकर जागा ट्रक टर्मीनससाठी आरक्षित आहे. ती खाजगी व्यक्ती अथवा संस्थेलादेखील विकसित करण्यासाठी घेता येणार आहे. मात्र त्यासाठीचा खर्च अधिक असल्याने अद्याप कोणीही ही जागा घेतलेली नाही.
या जागेसाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास मनपाला शेतजमिनीच्या तुलनेत स्वस्तात ही जमीन उपलब्ध होऊ शकेल. कारण शासकीय दराने ही जागा उपलब्ध होईल.