ॲपे रिक्षास डंपरची धडक; एक मयत, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 17:31 IST2020-12-21T17:31:07+5:302020-12-21T17:31:55+5:30
प्रवाशी ॲपे रिक्षास डंपरने दिलेल्या जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला मयत झाली.

ॲपे रिक्षास डंपरची धडक; एक मयत, दोन जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
नगरदेवळा, ता.पाचोरा : येथून जवळच असलेल्या आखतवाडे रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशी अँपे रिक्षा (एम.एच.४१/ सी ४१०५) या रिक्षास डंपर (एमएच१९/ झेड २१०९)ने दिलेल्या जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला मयत झाली तर दोघी जण जखमी झाल्या. अपघात सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
शरीफा बी. शेख जाबाज (५५, कासोदा) या किरकोळ कापड विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात सोनाबाई प्रकाश गढरी व सुनिता रमेश परदेशी या दोघी महिला गंभिर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ १०८ रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात रवाना केले आहे. दुपारी तीन वाजे दरम्यान घडलेल्या घटनेची माहीती मिळताच आखतवाडे तरूणांनी धाव घेत मदतकार्य केले तर नगरदेवळा दुरक्षेत्राचे पोलीस जमादार ज्ञानेश्वर पाटिल, पोलीस हेड काॅन्स्टेबल विनोद पाटील, अमोल पाटील, नरेंद्र विसपुते, अमोल पाटील हे तातडीने घटनास्थळावर दाखल झाले.