भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारात रानडुकरांसह वानरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 05:05 PM2019-03-18T17:05:38+5:302019-03-18T17:06:51+5:30

भडगाव ते जुना पिंपळगाव रस्त्यालगत टोणगाव शिवारात सध्या रानडुकरांसह वानरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात केळी, दादर, हरभरा यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

The apes of the monkeys with the Randukars in the Tonegaon Shivar in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारात रानडुकरांसह वानरांचा धुमाकूळ

भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारात रानडुकरांसह वानरांचा धुमाकूळ

googlenewsNext
ठळक मुद्देकेळी, दादर, हरभरा पिकांचे नुकसानपंचनाम्याची मागणी

भडगाव, जि.जळगाव : भडगाव ते जुना पिंपळगाव रस्त्यालगत टोणगाव शिवारात सध्या रानडुकरांसह वानरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात केळी, दादर, हरभरा यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रानडुकरांचा व वानरांचा त्वरित बंदोबस्त करावा. पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
टोणगाव शिवारात गट नंबर १६४ व गट नंबर १६५ मध्ये जुना पिंपळगाव रस्त्यालगत अवधूत अर्जुन महाजन यांची शेती आहे. रानडुक्कर व वानरांनी नवीन कांदेबागसह जुनारी केळी बागेच्या घडांसह नुकसानीचा सपाटा सुरू केला आहे. यात ठिबक सिंचनच्या संचाचेही नुकसान होत आहे. या शेतकऱ्याच्या नवीन केळीच्या ६०० खोडांचे नुकसान या प्राण्यांनी केले आहे. तसेच जुनारी केळी खांबांसह केळी घडांचेही नुकसान केले आहे. यासोबतच इतर पिके दादर, हरभरा आदी शेती पिकांचेही अतोनात नुकसान केले आहे. अशा परिस्थितीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करावा. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अवधूत अर्जुन महाजन या शेतकºयाने केली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार, तालुका कृषि विभाग, वनविभाग, भडगाव पीक संरक्षक सोसायटी आदींना देण्यात आले आहे.

Web Title: The apes of the monkeys with the Randukars in the Tonegaon Shivar in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.