विद्यापीठाच्या आखाड्यात राष्टवादी काँग्रेस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 07:33 PM2017-09-16T19:33:49+5:302017-09-16T19:43:13+5:30
उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी मतदान होत आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषद व महाविद्यालयीन प्राध्यापक गटात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. विशेषकरुन व्यवस्थापन परिषदेच्या गटात सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील व राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.१६,उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी मतदान होत आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषद व महाविद्यालयीन प्राध्यापक गटात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. विशेषकरुन व्यवस्थापन परिषदेच्या गटात सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील व राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
सर्वपक्षीय उमेदवार रिंगणात
व्यवस्थापन परिषदेसाठी लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी, धुळे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.महेश घुघरी, तळोदा विद्याप्रसारक मंडळाचे भरत माळी, चोपडा येथील शरश्चंद्र्रिका पाटील शिक्षण संस्था चोपडाचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील, पारोळा येथील किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांच्यात लढत आहे. मात्र यामधील काही उमेदवार हे राजकीय पक्षांशी संबधित असल्याने या निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. डॉ.महेश घुघरी हे भाजपाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर भरत माळी हे धुळे जिल्हा बॅँकेचे संचालक आहेत.
पहिल्या चार क्रमांकावरील उमेदवार ठरतील विजयी
व्यवस्थापन परिषदेच्या चार जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ८७ मतदार मतदान करणार आहेत. क्रमांकानुसार मतदान करायचे असल्याने पहिल्या चार क्रमांकावर असलेले उमेदवार या निवडणुकीत विजयी ठरणार आहेत. माजी अधिसभा सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या गटातील चार उमेदवार रिंगणात असून, डॉ.सतीश पाटील हे स्वत: वेगळ्या गटातून निवडणूक लढवित आहेत. व्यवस्थापन परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित होते. मात्र डॉ.सतीश पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक काट्याची झाली आहे. यासह महाविद्यालयीन प्र्राध्यापक गटातही एन.मुक्टो व एन.मुक्ता या प्राध्यापक संघटनांमध्येही चुरस आहे.