आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:17+5:302021-04-15T04:15:17+5:30
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन भीम महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात काव्य, सजावट, वक्तृत्व, आदी स्पर्धा घेण्यात ...
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन भीम महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात काव्य, सजावट, वक्तृत्व, आदी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये १४२ स्पर्धेकांनी सहभाग घेतला. या भीम महोत्सवाचे उद्घाटन भरत अमळकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्याचबरोबर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव यांच्या निवासस्थानी शिवाजी नगर येथे सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शरद भालेराव, दीपक जोशी, विलास यशवंते, हरिश्चंद्र सोनवणे, विठ्ठल भालेराव, कुलदीप भालेराव, प्रबुद्ध भालेराव, आदी उपस्थित होते.
==========================
मानवसेवा विद्यालय
मानवसेवा विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, शिशू मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच ऑनलाईन पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी गीत सादर केले. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली.
========================
महाराणा प्रताप विद्यालय
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका साधना शर्मा यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी संविधान वाचन केले. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी भीमगिते सादर केली. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेतला.
=======================
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान (फोटो)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाला प्रभुदास जावळे, प्रल्हाद जावळे, किरण जावळे, सतीश जावळे, लालदास गोयर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कारप्राप्त अविनाश जावळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. हर्षाली ढिलोर, पृथ्वी सोनवाल, शगुन सोनवाल, स्वामी गोयर, सीखा गोयर, निहाल गोयर, हिमांशी गोयर, जान्हवी सोनवाल, मोहित जावळे, नेहा तेजी, खुशी तेजी, नंदिनी पवार, राज तेजी, देवेंद्र जावळे, पायल सोनवाल, नंदिनी तेजी, युवराज जावळे, आदी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद जावळे, धीरज जावळे, सागर गोयर, राकेश गोयर, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अविनाश जावळे यांनी केले.
=======================
नूतन मराठा विद्यालय (फोटो)
नूतन मराठा विद्यालय येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक अे. पी. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी एस. व्ही. मराठे, डी. एस. सोनवणे, ए. बी. चौधरी, एम. बी. मोरे, एम. पी. पाटील, पी. आय. परदेशी, एन. एस. लेंडाईत, एस. एस. संदानशिव, पी. व्ही. वाडे, बी. व्ही. देशमुख, आदी उपस्थित होते.
==========================
मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्या. कार्यालय (फोटो)
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादीत संस्थेच्या मुख्य कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, ज. जि. मविप्रचे संचालक ॲड. विजय भास्करराव पाटील, माजी नगरसेवक सुनील माळी, सचिन धांडे, देविदास ठाकरे, अमोल कोल्हे, एस. एन. पाटील, आदी उपस्थित होते.