महात्मा बसेशवर जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:12+5:302021-05-12T04:16:12+5:30
समाजवादी पार्टीतर्फे कपडे वाटप जळगाव : कोरोनामुळे बाजार पेठा बंद असल्याने, तसेच उद्योग-व्यवसाय बंद असल्याने आगामी सण-साजरे गरिबांनाही साजरे ...
समाजवादी पार्टीतर्फे कपडे वाटप
जळगाव : कोरोनामुळे बाजार पेठा बंद असल्याने, तसेच उद्योग-व्यवसाय बंद असल्याने आगामी सण-साजरे गरिबांनाही साजरे करता यावे, यासाठी समाजवादी पार्टीतर्फे शहरातील विविध भागातील गरजू नागरीकांना किराणा माल व नवीन कपडे वाटप करण्यात आले. हुडको परिसरातील लहान मुलांना शिरखुर्मा व सुका मेवाचे पाकीट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष शेख मोईनोद्दीन ईकबाल उपस्थित होते.
शाहू नगरातील रस्त्यांची दुरवस्था
जळगाव : गोविंदा रिक्षा थांब्याकडून शाहू नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहन धारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर वाहन धारकांचे अधीकच हाल होत आहेत. त्यामुळे मनपाला प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तिकिट वेडिंग मशीन पडले धूळखात
जळगाव : रेल्वे स्टेशनवर दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले तिकीट वेडिंग मशीन कोरोना मुळे यंदा बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हे मशीन उघड्यावरच धूळखात पडले आहेत. यामुळे ते खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मशीनमुळे प्रवाशांना तात्काळ प्लँटफार्म तिकीट काढता येत होते. मात्र, कोरोनामुळे हे मशीन बंद असल्यामुळे आता तिकीट खिडकीतून रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना सॅनिटाइजर व मास्क देण्याची मागणी
जळगाव : कोरोनाच्या सुरुवातीला रेल्वे कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटाइजर देण्यात आले होते. मात्र, आता दुसऱ्या लाटेत देण्यात आलेले नसल्याने,त्यांना स्वतः या वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. तरी रेल्वे कर्मचाऱ्यांना सॅनिटाइजर व मास्क देण्याची मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांमधून करण्यात येत आहे.