सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:54+5:302021-04-17T04:14:54+5:30
जळगाव : प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार ...
जळगाव : प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकुण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल १० लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात केळी पिकांवर प्रक्रिया उद्योग व कार्यरत कृषी अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारासाठी पात्र असतील. त्यांना हा लाभ मिळणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा अर्ज तालुका कृषि अधिकारी यांचेकडे जमा करुन त्याची टपाल पोहोच घ्यावी. तसेच संबधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडून संसाधन व्यक्तीचा संपर्क क्रमांक घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.