आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:13 AM2021-07-01T04:13:05+5:302021-07-01T04:13:05+5:30
जळगाव : राज्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंनी विविध बाबींसाठी अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव सादर ...
जळगाव : राज्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंनी विविध बाबींसाठी अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेसाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, युथ ऑलिम्पिक, ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई व जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप या स्पर्धांना या योजनेसाठी अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा यास अपवाद राहील. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिद दीक्षित यांनी केले आहे.