ऑनलाईन दस्त नोंदणीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:57+5:302021-04-08T04:16:57+5:30

जळगाव : मुद्रांक विभागाने नागरीकांच्या सुरक्षितेतेच्यादृष्टिने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या असून ...

Appeal for online diarrhea registration | ऑनलाईन दस्त नोंदणीचे आवाहन

ऑनलाईन दस्त नोंदणीचे आवाहन

Next

जळगाव : मुद्रांक विभागाने नागरीकांच्या सुरक्षितेतेच्यादृष्टिने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या असून या सेवांचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जळगावचे सह जिल्हा निबंधक वर्ग २ सुनील पाटील यांनी केले आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले असून त्याचा वापर करून दस्त नोंदणी बाबत शासनास सहकार्य करावे. नागरिकांनी विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता डेटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत.

तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शासकीय कार्यालयात अभ्यागतांना ३० एप्रिल पर्यंत प्रवेशास मनाई केलेली असल्याने नागरीकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येऊ नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह अँड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी थांबविण्यात आल्याचेही पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Appeal for online diarrhea registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.