गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सहभागाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:16 AM2021-04-10T04:16:35+5:302021-04-10T04:16:35+5:30
अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे टाळावे जळगाव : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील ...
अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे टाळावे
जळगाव : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना ३० एप्रिलपर्यंत प्रवेशास मनाई करण्याचे आणि अभ्यागतांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार व अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे शक्यतो टाळावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
सभासद नोंदणी सुरू
जळगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित कला भवन येथे नवीन आर्थिक वर्ष २०२१-२०२२ याकरीता सभासद नोंदणी सुरु झाली आहे. याकरीता कामगारांनी वेबसाइट सभासद नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले आहे.
व्यवसायासाठी परवानगी द्या
जळगाव : नाभिक व परीट व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी शासनाने मुभा द्यावी, अशी मागणी आरपीआयने केली आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाभिक, परीट, शिंपी, खाटीक, सुतार अशा व्यावसायिक यांना अटी शर्ती वर व्यवसाय करण्यासाठी शासनाने मुभा द्यावी. महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांची स्वाक्षरी आहे.
साफसफाईची मागणी
जळगाव : न्यू बी. जे. मार्केट परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. तसेच नाल्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. परिणामी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.