कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:57+5:302021-05-21T04:17:57+5:30
जळगाव : राज्यात दरवर्षी शेती आणि पूरक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा संस्थांना कृषी विभागातर्फे शेती क्षेत्राशी संबंधित विविध ...
जळगाव : राज्यात दरवर्षी शेती आणि पूरक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा संस्थांना कृषी विभागातर्फे शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- राज्यातून एक, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार - आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक या प्रमाणे पुरस्कार दिले जातात.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जिल्हा स्तरावर दिला जातो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार- आठ कृषी विभागातून प्रत्येकी १ अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी व कर्मचारी याप्रमाणे एकूण नऊ पुरस्कार देण्यात येतात.
अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.