दहावी,बारावतील गुणवंतांवर कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:55+5:302021-08-12T04:19:55+5:30
जळगाव : नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा ...
जळगाव : नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळांमध्ये सत्कार करून कौतुकाची थाप देण्यात आली आहे.
थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (११ सीटीआर २४)
म्हसावद येथील पं.ध.थेपडे विद्यालयात येथे इयत्ता बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाणिज्य विभागातून नेहा सूर्यवंशी, प्रियंका चिंचोरे, मिना पाटील आणि कला विभागातून भाग्यश्री चौधरी, अभिषेक मराठे, तुषार पाठक यश मिळविणा-या गुणवतांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी प्राचार्य एस.बी.सोनार, जी.डी.बच्छाव, एस.के.भंगाळे, वाय़.पी.चिंचोरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्रृती पाटील यांनी केले तर आभार अमोल चौधरी यांनी मानले.
००००००००००००
बेंडाळे महिला महाविद्यालय
डॉ़ अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व कौतुक सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रम शाखेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणा-या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.गौरी राणे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निकाल वाचन उपप्राचार्या सुनीता पाटीलयांनी केले. गुणवंत विद्यार्थिनी भाग्यश्री धांडे आणि नेहा ठाकूर यांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. आर.एस.कोष्टी यांनी केले.
०००००००००००००
अकॅडेमिक हाईट्स पब्लीक स्कूल (११ सीटीआर २६)
अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित अकॅडेमिक हाईट्स पब्लीक स्कूलचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा संस्थेचे अध्यक्ष अे.पी.चौधरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. चौधरी यांनी विद्यार्थिनींना करिअर संधीबाबत मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बी़एम़महाजन, स्कूलच्या प्राचार्या डॉ. डिंपल पाटील, डॉ. सतिष जाधव आदी उपस्थित होते.
०००००००००००००००
जय दुर्गा माध्यमिक विद्यालय (११ सीटीआर २९)
जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचलित जय दुर्गा माध्यमिक विद्यालयातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी ललित धांडे, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती पाटील, मुख्याध्यापक सागर कोल्हे यांची उपस्थिती होती. दहावतील हर्षा दहीभाते, देवयानी सोनवणे, नीलेश राठोड तर बारावीतील तेजस विसपुते, अंबर मेमरोट, रोहित वाल्हे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजश्री चौधरी यांनी केले तर आभार सविता पाटील यांनी मानले.
००००००००००००००
जयश्री पाटीलचे यश (११ सीटीआर ३०)
काशिबाई उखाजी कोल्हे महाविद्यालयातील विद्यार्थिनी जयश्री गजानन पाटील ही ९२.३३ टक्के मिळवून प्रथम आली आहे.तिला शिक्षक व वडील गजानन व आई वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
०००००००००००
छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र विद्यालय (११ सीटीआर २७ आणि २८)
छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बीएडचा निकाल ९९ टक्के लागला आहे. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी रूपाली ह्या ९५.५५ टक्के मिळवून प्रथम तर प्रभा माळी ९२.३५ टक्के मिळवून द्वितीय व कामिनी भदाणे ९२.२५ टक्के मिळवून तृतीय व चतुर्थ क्रमांक माधुरी तळेले यांनी ९२.२ टक्के मिळवून तर ९२ टक्के प्राप्त करित पूनम बोरसे यांनी पाचवा क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष आर.व्ही.पाटील, प्रभारी प्राचार्य माधुरी पाटील, किशोर गुंजाळ, विश्वनाथ महाजन, गीता तीर्थकर, राजेश पावरा, किरण कांबळे, सरिता येवले, समाधान धनगर, गोरख राठोड यांनी कौतुक केले आहे.