विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी २५ मेपर्यंत अर्ज भरता येणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:16 AM2021-05-20T04:16:58+5:302021-05-20T04:16:58+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता महाविद्यालये, परिसंस्थांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत विधि अभ्यासक्रमाच्या पदवी स्तरावरील सत्र-१ च्या नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात होणाऱ्या परीक्षांकरिता परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने काही दिवसांपूर्वी विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक व अर्ज सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारपासून काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. दुसरीकडे विधि अभ्यासक्रमातील एलएल.बी. सत्र १ व बी.ए.एलएल.बी. सत्र १ च्या परीक्षा जून महिन्यात होणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. २५ मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करावयाचे आहे. काही कारणास्तव अर्ज करण्यास विलंब झाल्यास विद्यार्थ्यांना २८ मेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज सादर करावा लागणार आहे.