५ जूनपूर्वी अर्ज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:52+5:302021-06-01T04:13:52+5:30
ऑक्सिजन निर्मिती उद्योगांना विशेष प्रोत्साहन जळगाव : भविष्यात राज्यासाठी दररोज २३०० मे. टन प्राणवायू पुरवठ्याची आवश्यकता राहणार असल्याने ...
ऑक्सिजन निर्मिती उद्योगांना विशेष प्रोत्साहन
जळगाव : भविष्यात राज्यासाठी दररोज २३०० मे. टन प्राणवायू पुरवठ्याची आवश्यकता राहणार असल्याने मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत ऑक्सिजन निर्मिती उद्योगांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. याचा लाभ प्राणवायू निर्मिती उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांनी केले आहे.
आज आंदोलन
जळगाव : शासनाने मागासवर्गीयांच्या पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी १ जूनला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केले आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
जळगाव : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार अमित भोईटे, आदी उपस्थित होते.
वीज पुन्हा गूल
जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, सोमवारी दुपारीदेखील अनेक वेळा जिजाऊ नगर, वाघ नगर, रुक्मिणी नगर या भागात वीज पुरवठा खंडित झाला. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहे.