कंत्राटी पद्धतीची नियुक्ती ही नवीन गुलामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:44+5:302021-02-08T04:14:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संविधानाची अंमलबजावणी न केल्यास कंत्राटी पद्धतीवर डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक यांची पदे भरली जात आहेत, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संविधानाची अंमलबजावणी न केल्यास कंत्राटी पद्धतीवर डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक यांची पदे भरली जात आहेत, ही नवी गुलामी असल्याची टीका इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पुणे येथील डॉ. मगन ससाणे यांनी केली आहे. जळगावात आयोजित इम्पाच्या खान्देशस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. रविवारी अल्पबचत भवनात विविध जिल्ह्यातून आलेल्या डॉक्टरांच्या उपस्थितीत हे अधिवेशन झाले.
उद्घाटन डॉ. मनोजकुमार गावित यांनी केले. आपले अधिकार वाचवायचे असतील तर बहुजन समाजातील डॉक्टर्सनी आपल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले.
आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. या देशात क्रांती करणाऱ्या आमच्या महापुरुषांना बदनाम केले गेले, अशी टीका प्रमुख वक्ते
डॉ. शाकीर शेख यांनी केली. रवी भालेराव, यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मगन ससाणे यांनी राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक संघटन असणे आवश्यक आहे, ते काम इम्पा राष्ट्रीय पातळीवर करीत आहे. इम्पा हे गैरराजनैतिक संघटन असल्याचे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर डॉ. मुदस्सर, डॉ. अजय माळी, डॉ. शाकीर शेख, डॉ. कामरान शेख, डॉ. माधुरी तायडे, डॉ. वृषाली गांगुर्डे, डॉ. विजय गायकवाड, आर.एम.अडकमोल, महेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन सुनील देहडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार नितीन गाढे यांनी मानले. इम्पाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अजय माळी यांची निवड करण्यात आली आहे.