पात्रता डावलून आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:23 AM2021-06-16T04:23:56+5:302021-06-16T04:23:56+5:30
जळगाव : तालुका आरोग्य अधिकारीपदासाठी एमबीबीएस पात्रताधारक उपलब्ध असतानाही त्यांना डावलून बीएएमएस पदवीधारकांना या पदावर नियुक्त्या देण्यात आल्या असून ...
जळगाव : तालुका आरोग्य अधिकारीपदासाठी एमबीबीएस पात्रताधारक उपलब्ध असतानाही त्यांना डावलून बीएएमएस पदवीधारकांना या पदावर नियुक्त्या देण्यात आल्या असून याबाबत चौकशी करून कारवाईची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत सीईओंना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, याबाबत आपण मार्च महिन्यात तक्रार देऊनही यात कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसून या सुधारणेबाबत प्रशासन उदासीन आहे. एकीकडे पात्रताधारक उपलब्ध असतानाही त्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. तर, एमबीबीएस डॉक्टर शासकीय सेवेत येत नसल्याचेही प्रशासकीय अधिकारी सांगतात. मात्र, या ठिकाणी होणाऱ्या राजकारणामुळे हे डॉक्टर प्रशासकीय सेवेत येत नसल्याचे भोळे यांनी म्हटले आहे. एकाच पदावर नेहमी तीचतीच व्यक्ती ठेवणे चुकीचे असून यात सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.