लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:35+5:302021-04-27T04:16:35+5:30

जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीकरण कार्याला अधिक गती यावी सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिव्यांग, ज्येष्ठ व शासनाच्या निर्देशानुसार ...

Appointment of Mukund Gosavi as Star Pracharak for Vaccination Awareness | लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

Next

जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीकरण कार्याला अधिक गती यावी सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिव्यांग, ज्येष्ठ व शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना लसीकरणात समाविष्ट केले आहे, त्या साऱ्यांना लसीकरण कार्याची प्रभावी माहिती देऊन १०० टक्के लसीकरणाची अंमलबजावणी व्हावी, याकरिता कोरोना लसीकरण कार्याचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून मुकुंद गोसावी यांची जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे.

मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी हे सामाजिक व आरोग्यविषयक कार्यात नेहमी स्वयंस्फूर्तीने निरपेक्षपणे सहभागी होतात. रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, देहदान, व्यसनमुक्ती, तंबाखूमुक्ती, कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स निर्मूलन, पल्स पोलिओ, मानसिक आरोग्य तसेच विविध आरोग्य शिबिरांमध्ये आरोग्य यंत्रणेला सहकार्य नेहमी सहकार्य करीत असतात.

गोसावी यांनी कोरोनाच्या कठीण काळातही शारीरिक व्यंगाला न जुमानता कोरोना जनजागृती पत्रक वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप, पॉझिटिव्ह रुग्णांची भीती कमी करणे, त्यांचे समुपदेशन करणे, रुग्णांना वैद्यकीय सेवेचे सहकार्य आदी कार्यही तन्मयतेने करतात, असेही डॉ. चव्हाण यांनी नियुक्तिपत्रात म्हटले आहे.

Web Title: Appointment of Mukund Gosavi as Star Pracharak for Vaccination Awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.