जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरंन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:03 PM2020-05-06T19:03:13+5:302020-05-06T19:03:27+5:30

जळगाव - लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यात ...

 Appointment of officers for quarantine the citizens coming in Jalgaon taluka | जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरंन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरंन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next

जळगाव- लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. अशा परवानगी प्राप्त नागरिक पर जिल्ह्यातून व परराज्यातून जळगाव तालुक्यात येणार आहे. त्यामुळे या नागरिकांना तालुक्यात प्रवेश दिल्याबरोबर त्यांचा, त्यांच्या कुटूंबीयांशी किंवा अन्य नागरिकांशी संपर्क येण्यापूर्वीच त्यांना कॉरन्टाईन ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी जळगाव महानगरपालिकाक्षेत्र व संपूर्ण तालुकाक्षेत्रासाठी अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़
जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे (९९२२३३४४७८), आरोग्य अधिकारी विकास पाटील (९४०३६८६२१०) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगाव तालुका ग्रामीण क्षेत्रासाठी जळगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे (९१५८४८४६३८), संजय चव्हाण (९३७३३९३७७७), सुधा गिंधेवार (९४०३१०२४५९) या अधिकाºयांची नियुक्ती केलेली आहे. दरम्यान, नागरिकांनी अथवा माहितगारांनी आपल्या भागात कोणी बाहेर जिल्ह्यातून, परराज्यातून आले असल्यास या अधिकाºयांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Web Title:  Appointment of officers for quarantine the citizens coming in Jalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.