शेख मोहिनुद्दीन इकबाल यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:15+5:302021-07-12T04:12:15+5:30
जळगाव : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून शेख मोहिनुद्दीन इकबाल यांची नियुक्ती केली ...
जळगाव : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून शेख मोहिनुद्दीन इकबाल यांची नियुक्ती केली आहे. तसेच महानगरध्यक्ष म्हणून डॉ. मोबिन शाह, यावल तालुकाध्यक्ष असलम मोमीन, जिल्हा उपाध्यक्ष साजीद तडवी, जळगाव लोकसभा उपाध्यक्ष शेख शकिल नुर, महिला जिल्हाध्यक्ष साजिया शेख इकबाल यांचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे. निवड करतेवेळी शेख नुर, सागर मराठे, विशाल बोरसे, इप्तिहार शेख, अल्ताफ शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बहुजन मुक्ती पार्टीची सभा उत्साहात
जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीची रविवारी पद्मालय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या बैठकीत शहरातील विविध समस्यांबाबत आंदोलन करण्याचे ठरले. यावेळी जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, महानगराध्यक्ष इरफान शेख, सचिन सुरवाडे, रियाज पटेल, खुशाल सोनवणे, रियाझ शेख, देवानंद निकम, फरिद खान, सुनील देहडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
औरंगाबादसाठी रात्री आठनंतर बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय
जळगाव : जळगाव आगारातून सायंकाळी आठनंतर औरंगाबादसाठी बसेस उपलब्ध नसल्याने, प्रवाशांची गैरसोय होत आहे. रविवारी रात्री जळगाव बस स्थानकात औरंगाबादला जाण्यासाठी बस नसल्यामुळे अनेक प्रवासी स्थानकात ताटकळत बसले होते. त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेता, जळगावहून रात्री आठनंतरही औरंगाबादसाठी विशेष बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघातर्फे आज धरणे आंदोलन
जळगाव : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे १२ जुलै रोजी एससी, एसटी, एनटी, एसबीसी व ओबीसी संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी संबंधित संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
जळगाव : मराठी प्रतिष्ठानतर्फे रविवारी शीतल छाया वृक्षारोपण प्रकल्पाअंतर्गंत मोहाडी रस्त्यावर शासकीय महिला रुग्णालयापर्यंत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, सविता नंदनवार, डॉ. विद्या चौधरी, मतिन पटेल, संदीप मांडोळे उपस्थित होते.