वरणगावकरांच्या ठिय्यानंतर दोन डॉक्टरांची नियुक्ती
By admin | Published: April 19, 2017 05:42 PM2017-04-19T17:42:43+5:302017-04-19T17:42:43+5:30
तीन महिन्यांपासून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची नियुक्ती नसल्याने रुग्णांचे हाल होत होते.
Next
जळगाव,दि.19 - वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कोणत्याही डॉक्टराची नियुक्ती करण्यात आली नसल्याने, या ठिकाणी डॉक्टरांविना रुग्णांची होणारी हेळसांड होत होती, रुग्णांचे हाल थांबावेत म्हणून या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करा या मागणीसाठी बुधवारी वरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक सुनील काळे व कॅस्ट्राईब संघटनेचे मिलिंद मेढे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील भामरे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारले, दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर जिल्हा शल्य चिकत्सकांनी त्यांच्या मागण्याची दखल घेत तत्काळ दोन डॉक्टरांची वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती केली.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने या ठिकाणी येणा:या रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत येथील नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे निवेदने देऊनदेखील डॉक्टराची नियुक्ती केली जात नसल्याने बुधवारी वरणगाव नगरपालिकेचे नगरसेवक सुनील काळे यांनी काही कार्यकत्र्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी 1 वाजता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन पुकारले. तसेच जोर्पयत डॉक्टराची नियुक्ती केली जाणार नाही. तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला.
दोन डॉक्टरांची नियुक्ती
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे व अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्याशी आंदोलनकत्र्यानी चर्चा केली. डॉ.सुनील भामरे यांनी डॉ.देवश्री घोषाल यांचा यावल येथील कार्यभार काढून वरणगाव येथे तात्पुरती नियुक्ती केली आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.दिनेश खेताळे यांची कायमस्वरुपी नियुक्ती केल्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.