स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१.६१ कोटी निधी वितरणास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:02+5:302021-05-29T04:14:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, ...

Approval for disbursement of Rs. 31.61 crore to local bodies | स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१.६१ कोटी निधी वितरणास मान्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१.६१ कोटी निधी वितरणास मान्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसाठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) २०२१-२२ मधील प्रस्तावित ३१.६१ कोटी रुपयांच्या निधी वितरणास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाच्या जोडरस्त्याच्या मार्गातील उच्चदाब, लघुदाब वीज वाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात समितीची जिल्हास्तरीय बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

जळगाव महानगरपालिकेस ५ कोटी

सुविधा पुरविण्यासाठी जळगाव महानगरपालिकेस ५ कोटी रुपयांचा तर जिल्ह्यातील १८ नगरपालिका, नगरपंचायतींना २६.६१ कोटी रुपये असा एकूण ३१.६१ कोटी रुपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मंजूर झाला आहे. भुसावळ नगरपालिकेस ८ कोटी ९५ लाख, अमळनेर २ कोटी २५ लाख, चाळीसगाव ३ कोटी २० लाख, चोपडा १ कोटी ७० लाख, पाचोरा १ कोटी ८५ लाख, जामनेर १ कोटी १५ लाख, पारोळा ५२ लाख, धरणगाव ६२ लाख, एरंडोल ६५ लाख, यावल ८५ लाख, रावेर ६५ लाख, फैजपूर ५३ लाख, भडगाव ६० लाख, वरणगाव १ कोटी १५ लाख, बोदवड नगरपंचायत ६५ लाख, मुक्ताईनगर नगरपंचायत ८० लाख, शेंदूर्णी नवनिर्मित नगरपंचायत ४९ लाख ९१ हजार २२५ रुपये असा एकूण २६ कोटी ६१ लाख ९१ हजार २२५ रुपयांचा निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात वितरीत करण्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

जळगाव शहरात ४ कोटी १७ लाखांच्या कामास मान्यता

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेत जळगाव शहर महानगरपालिकेस २०१६-१७ या वर्षात प्राप्त झालेल्या २५ कोटी रुपयांच्या अनुदानातून शिल्लक राहिलेल्या ४.१७ कोटी रुपयांच्या अनुदानातून नवीन विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत. यात वार्ड क्रं. १९ अंतर्गत येत असलेल्या सुप्रिम कॉलनीत व आजुबाजुच्या परिसरात अस्तित्वात असलेल्या विजेच्या खांबावर पथदिव्याची व्यवस्था करणे, जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाच्या जोडरस्त्याच्या मार्गातील उच्चदाब, लघुदाब वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, प्रभाग क्र. २ कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, जळगाव शहरात आवश्यक ठिकाणी स्त्री व पुरुषांकरीता स्वच्छतागृह, युरिनल्सची व्यवस्था करणे, डी मार्ट ते रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्राळा स्मशानभुमी सुशोभीकरण करुन विकसित करणे, प्रभाग क्र. १२ मधील रामदास कॉलनी येथे संरक्षण भिंत बांधणे आदी कामांना बैठकीत पालकमंत्र्यांनी मान्यता दिली.

Web Title: Approval for disbursement of Rs. 31.61 crore to local bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.