शिक्षण शुल्क समिती बरखास्त करण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:21+5:302020-12-06T04:16:21+5:30
जळगाव : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत अशासकीय संस्थांमध्ये राबविण्यात येणा-या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अशा सर्वच अभ्यासक्रमांसाठी ...
जळगाव : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत अशासकीय संस्थांमध्ये राबविण्यात येणा-या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अशा सर्वच अभ्यासक्रमांसाठी गठीत करण्यात आलेल्या शिक्षण शिक्षण शुल्क समिती बरखास्त करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसे आदेश नुकतेच शासनाने काढले आहे.
औद्योगिककरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल इत्यादींमुळे व्यवसाय शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमात काळानुरूप सुधारणा तसेच वाढ करणे व इतर समस्यांबाबत तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैेठक होवून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत राबविण्यात येणा-या अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क समिती गठीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली होती. दरम्यान, ही समिती बरखास्त करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला होता. अखेर या प्रस्तावाची दाखल घेवून अशासकीय संस्थांमध्ये राबविणा-यात व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अशा सर्वच अभ्यासक्रमांसाठी गठीत करण्यात आलेली शिक्षण शुल्क समिती तसेच विद्यमान संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती रद्द करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे़