जळगावला शासकीय आयुर्वेद महाविद्यालयास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:08 PM2019-07-23T12:08:48+5:302019-07-23T12:09:16+5:30
नवे अधिष्ठाता डॉ. निकम यांची नियुक्ती
जळगाव : जळगाव जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी प्रयत्न सुरु होते. दोन वर्षांपूर्वी त्यास मान्यता मिळून प्रवेश देखील झाले होते. पुन्हा त्या ठिकाणी आयुवेर्दीक महाविद्यालय सुरु करण्यास सोमवारी मान्यता मिळाली आहे. डीन म्हणून डॉ. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावकरांना ही भेट मिळाली असून १०० विद्यार्थ्यांना बीएएमएस वर्गात प्रवेश मिळणाार आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळावी याकरिता मेडिकल हब हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. यात ११ महिन्यात १०० प्रवेशाच्या एमबीबीएसला मान्यता मिळाली. याच एमबीबीएसची प्रवेश क्षमता वाढवून १५० करण्यात आली. तसेच चिंचोली शिवारात १३५ एकरात वास्तुची तयारी सुरु आहे. अशातच आता आयुर्वेदिक काँलेजला मान्यता मिळाली आहे.