चहार्डी येथील सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 09:15 PM2019-07-22T21:15:36+5:302019-07-22T21:16:00+5:30

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सरपंच उषा रमेश पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर २२ जुलै रोजी ...

 Approval Resolution against the Sarpanch of Chahurdi | चहार्डी येथील सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

चहार्डी येथील सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

Next



चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील सरपंच उषा रमेश पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर २२ जुलै रोजी दुपारी बारा वाजता ग्रामसचिवालयाच्या सभागृहात चर्चा झाली. १२ विरुद्ध ४ मतांनी ठराव मंजूर करण्यात आला. पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावित होते.
चहार्डी ग्रामपंचायत सदस्य प्रमिला प्रकाश पाटील, किरण विश्वनाथ चौधरी, लीलाबाई जंगलू भिल, संजय प्रताप मोरे, संदीप दत्तात्रय पाटील, तुळशीराम धनराज कोळी, जगदीश निंबा पाटील, प्रशांत नथू पाटील, वर्षा ज्ञानेश्वर पाटील, मीना अशोक पाटील, संगीता तुळशीराम कोळी, कल्पना योगेश महाजन, इंदू रघुनाथ वारडे यांनी सरपंच उषा पाटील यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
१७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अपात्र ठरलेल्या संगीता कोळी यांना गावित यांनी मतदानापासून अलिप्त ठेवले. उपस्थित १६ पैकी १२ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. सरपंचांसह चार सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. अखेर १२ विरोधात ४ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार गावित यांनी दिली.
यावेळी मंडलाधिकारी एस.एल.पाटील, डी.आर. पाटील, सुरेश पाटील, तलाठी कुलदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी भदाणे यांनी सहकार्य केले.

Web Title:  Approval Resolution against the Sarpanch of Chahurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.