स्वीकृत सदस्य निवड पुढच्या आठवड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:49+5:302021-05-30T04:14:49+5:30
जळगाव : भाजपचे महापालिकेत चार स्वीकृत सदस्य आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यात राबवली जाणार असल्याची माहिती भाजपचे नेते ...
जळगाव : भाजपचे महापालिकेत चार स्वीकृत सदस्य आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यात राबवली जाणार असल्याची माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यामुळे आता चार सदस्यांकडून राजीनामे घेतले जाणार आहेत.
महापौर आणि उपमहापौरपदासह स्वीकृत नगरसेवक पददेखील दहा महिन्यांसाठीच देण्याचे ठरले होते. मात्र अडीच वर्षांच्या वर काळ लोटला तरी स्वीकृत नगरसेवक बदलले गेले नव्हते. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढली होती. आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे सदस्य निवडले जाणार आहेत. मधल्या काळात भाजपमध्ये मोठे बंड झाले. त्यात भाजपला महापौर आणि उपमहापौर पददेखील गमावावे लागले. या दरम्यान स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर पडली. त्यामुळे अनेक इच्छुकदेखील मागे पडले. आता पुन्हा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या सूचना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोट - स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत शनिवारी बैठक झाली नाही. पुढच्या आठवड्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड करू. - गिरीष महाजन, माजी मंत्री