जळगावातील समांतर रस्त्याच्या कामाला एप्रिलचा मुहूर्त, जिल्हाधिका-यांनी दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:19 PM2018-01-10T13:19:33+5:302018-01-10T13:29:30+5:30
समांतर रस्ते कृती समितीच्या आंदोलनाला यश
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10- जळगाव शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या समांतर रस्त्याचे काम एप्रिल अखेर करण्यात येईल, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी समांतर रस्ते कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांना दिले. यामुळे शहरातील हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, या समांतर रस्त्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर तब्बल 50 मिनिटे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाना जिल्हा प्रशासनाच्या पत्राने यश आल्याचे मानले जात आहे.
जळगाव शहरातील 5 लाख नागरिकांच्या जीवन मरणाचा ज्वलंत विषय बनलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा विस्तार व समांतर रस्ते विकास यासाठी बुधवार, दि. 10 जानेवारीस समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 10.45 वाजता रस्तारोकोस सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांना समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जोर्पयत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तो र्पयत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम होते. त्यावेळी जिल्हाधिका:यांनी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या कामातून कोणकोणती कामे करण्यात येणार आहे, याची माहिती दिली व तसे लेखी पत्र कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांकडे दिले. त्यानंतर 50 मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. महामार्गावर कोणताही गोंधळ व अनुचित प्रकार न होता आंदोलन शिस्तबद्धतेत व शांततेत पार पडले.
समांतर रस्त्यांचा मागणीसाठी जळगावकरांची ‘वज्रमुठ’
शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांचे काम सुरु करण्यात यावे या मागणीसाठी समांतर रस्ता कृतीसमितीच्या वतीने बुधवारी शहरातील अजिंठा चौकात ‘महामार्ग रोको’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात 2 हजारहून अधिक शालेय विद्यार्थी व हजारो जळगावकरांनी सहभागी घेवून, ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’ असा हुंकार भरत, प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हाधिका:यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलकांना लेखी हमी दिल्यानंतर या आंदोलनाचा समारोप झाला.
या आंदोलनासाठी जळगावकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी 9.30 वाजेपासून शालेय विद्याथ्र्यानी हातात विविध घोषणांचे फलक घेवून, आपल्या शिक्षकांसह अजिंठा चौकात जमायला सुरवात केली होती. तर सर्वसामान्य नागरिक देखील सकाळी 10 वाजेर्पयत या ठिकाणी जमले होते. 10.45 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’, ‘अभी तो ली अंगडाई है, असली लडाई बाकी है’, अशा घोषणांनी संपूर्ण अजिंठा चौक आंदोलकांनी दणाणून सोडला होता.
आंदोलनादरम्यान जाणा:या रुग्णवाहिका व अंत्ययात्रेला आंदोलकांनी मार्ग करुन दिला. तसेच आंदोलनादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही अनुचित कार्य आंदोलकांनी केले नाही.