अर्चित पाटील व शिवांगी काळेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार; नवसंशोधन व शौर्याचा केला गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 05:25 PM2023-04-07T17:25:10+5:302023-04-07T17:25:21+5:30
अर्चित पाटील व शिवांगी काळेचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कुंदन पाटील
जळगाव : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ चा मानकरी अर्चित राहुल पाटील व २०२२ ची पुरस्कार्थी शिवांगी काळे या दोन्ही बालकांचा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत दोघा बालकांचा हा गौरव आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पूर्वसन समिती, जिल्हा परिवक्षा समिती, जिल्हास्तरीय कृतीदल, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा स्तरीय समिती वनस्टॉप सेंटर, बाल कल्याण समितीच्या आढावा बैठकीत या दोन्ही बालकांना गौरविण्यात आले. अर्चितने नवसंशोधन तर शिवांगीने धाडस दाखवून आईचा जीव वाचविला होता. त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता.
यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, , बाल कल्याण समितीच्या देवयानी गोविंदवार, सदस्य संदीप पाटील वृषाली जोशी, वैशाली विसपुते, विद्या बोरनारे, जि,पचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, जिल्हा परीविक्षा अधिकारी एस.आर.पाटील, परिवक्षा अधिकारी सारिका मेतकर व महेंद्र पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश एस. मुक्कावार, निरीक्षण गृहाच्या अधीक्षका श्रीमती जयश्री पाटील, रविकिरण अहिरराव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
३०० बालकांच्या प्रस्तावांना मंजुरी
कोविड प्रभावित ४३७ बालकांना यापूर्वी लाभ दिला गेला आहे. तर या आढावा बैठकीत ३०० मुलांना मदतीसाठी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.पीडित लाभार्थीना समुपदेशन आणि आवश्यक विधीसेवा व पोलीस दलाची मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग व विधिसेवा प्राधिकरण यांनी लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.