जळगावचा अर्चित पाटील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 07:59 PM2021-01-25T19:59:47+5:302021-01-25T19:59:47+5:30

जळगाव  - येथील काशिनाथ पलोड विद्यालयाचा विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने आज व्हर्च्युअली कार्यक्रमात सन्मानित ...

Archit Patil of Jalgaon honored with Prime Minister's National Children's Award | जळगावचा अर्चित पाटील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

जळगावचा अर्चित पाटील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

Next

जळगाव  - येथील काशिनाथ पलोड विद्यालयाचा विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने आज व्हर्च्युअली कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनीही अर्चित पाटील याचा शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व जळगाव जिल्ह्याचे कॉपीटेबल बुल देऊन सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण दरवर्षी होते. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे व्हर्च्युअली कार्यक्रमात पंतप्रधानाच्यावतीने जिल्हाधिकारी राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील एनआयसी कार्यालयात अर्चितला सन्मानित केले.

विशेष शौर्य गाजविणाऱ्या 18 वर्षाखालील मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याची नावे यापूर्वीच जाहीर करण्यात आली असून त्यात सर्वाधिक 5 पुरस्कार महाराष्ट्रातील मुलांना जाहीर झाले आहेत. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या अर्चित राहुल पाटील याची नवनिर्माण क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी  25 जानेवारी दुपारी 12.00 व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे पुरस्कार प्राप्त बालकांना पुरस्कृत केले. यावेळी केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अर्चित राहुल पाटील याचा सन्मान व अभिनंदन केले. याप्रसंगी अर्चित पाटील याचे आई-वडील, आजी यांचेसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते. देशातील एकूण 32 मुलांना शौर्य, समाज व क्रिडा, कला व सांस्कृतीक व नवनिर्माण या क्षेत्राकरीता हे पुरस्कार देण्यात आले. यात महाराष्ट्राच्या 5 मुलांचा समावेश असून जळगाव जिल्ह्याला या पुरस्काराचा सन्मान सलग दुसऱ्यांदा मिळाल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

अर्चित राहूल पाटील याचा परिचय

अर्चित पाटील हा येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी असून इनोव्हेटिव्ह, लाइफ सेव्हिंग, अल्ट्रा लो कॉस्ट सिलिकॉन डिव्हाइस, पोस्टपार्टम हेमोररेज कप (पीपीएच कप) विकसित केले आहे. हे प्रसूतीनंतर रक्त कमी होणे अचूकपणे आणि रीअल-टाइममध्ये मोजण्यात मदत करते.

प्रसूती, पॅरामेडिक्स आणि रूग्णांनी पीपीएच कपमध्ये सहज रुपांतर केले. प्रसुतिपूर्व रक्तस्राव (पीपीएच) च्या बाबतीत लवकर उपाययोजना करून अनेकांचे प्राण वाचू शकेल. ओव्हरेन्टुसिएस्टीक मोठ्या प्रमाणात रक्त संक्रमण आणि त्याच्याशी संबंधित दुष्परिणाम रोखले गेले. यामुळे बायोमेडिकल सॅनिटरी कचऱ्याची निर्मिती कमी केली गेली. या ५० ग्रॅम डिव्हाइसचा प्रभाव प्रचंड आणि प्रमाणीकृत आहे. याचा वापर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केला जात आहे. पीपीएचमुळे जागतिक पातळीवर माता मृत्युदर कमी होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी स्वच्छताविषयक कचऱ्यावरील डॉ. होमी भाभा बाल वैद्यनिक स्पर्धात २०१७-१८ मध्ये विज्ञान संशोधन प्रकल्प ह्लटर्न अवर रेड ग्रीनह्व अर्चितला सुवर्णपदक मिळाले होते.

मी भारत सरकारच्या माता आणि बाल आरोग्य योजनांमध्ये या डिव्हाइसचा समावेश करण्याची प्रार्थना करतो. तळागाळातील स्तरावर पोहोचण्याद्वारे, जर मी एखाद्या आईचे जीवन वाचविण्यास योगदान देऊ शकलो तर ते माझे सर्वात मोठे यश असेल असे अर्चितने हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले आहे.

Web Title: Archit Patil of Jalgaon honored with Prime Minister's National Children's Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.