रांजणी परिसरात बिबट्याचा बछड्यांसह वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:47 PM2020-02-09T18:47:21+5:302020-02-09T18:48:26+5:30

रांजणी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह दिसत आहे.

In the area of Ranjani, a fever with marijuana calves | रांजणी परिसरात बिबट्याचा बछड्यांसह वावर

रांजणी परिसरात बिबट्याचा बछड्यांसह वावर

googlenewsNext
ठळक मुद्देवनअधिकाऱ्यांची रांजणीत पाहणीसावधानी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

जामनेर, जि.जळगाव : रांजणी, ता.जामनेर शिवारातील शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह दिसत आहे. यामुळे रविवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहकाºयांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रांजणी येथील संजय रघुनाथ भगत व लखीचंद शिवचंद जेरवाल यांना शेतात रात्री बछड्यांसह बिबट्या दिसल्याने भागवत तेली यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांना कळविले.
वनरक्षक एस.एम.कोळी, वनरक्षक पी.एस.भारुडे, नाकेदार ए.एस.ठोमरे, वनरक्षक पी.एन.गरजाळे, वनरक्षक यु.एन. कोळी, वनरक्षक विकास गायकवाड, गणेश कन्नारे, प्रल्हाद काळे यांनी भगत व जेरवाल यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसत नसले तरी शेतकºयांंनी सावधानता बाळगण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Web Title: In the area of Ranjani, a fever with marijuana calves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.