आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांचा जामीन अर्जावर युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:59+5:302021-04-02T04:15:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांच्या जामीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात सरकार व बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून त्यावर आता न्यायालय ५ एप्रिल रोजी आदेश पारित करणार आहे.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात बुधवारी ३१ जणांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर तपासाधिकारी प्रताप शिकारे यांनी गुरुवारी खुलासा सादर करून जामिनावर हरकत घेतली आहे. आमदार मंगेश चव्हाण व इतर २५ जणांच्या वतीने ॲड. गोपाळ जळमकर तर ॲड. अकील इस्माईल यांनी सहा जणांच्या वतीने युक्तिवाद केला. सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली.