बचत गटाचा ठेका रद्द केल्याने जळगाव जिल्हा परिषदेत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:42 PM2018-10-15T22:42:17+5:302018-10-15T22:43:51+5:30
जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी मारहाण केल्याची तक्रार कादीर तडवी यांनी केली आहे.
जळगाव : बचत गटास दिलेला ठेका का बंद केला? अशी विचारणा करीत याबबत तक्रार घेवून आलेल्यास जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी मारहाण केल्याची तक्रार कादीर तडवी यांनी केली आहे. दरम्यान या आरोपाचे खंडन करीत तक्रारदारानेच आपणास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे स्पष्टीकरण अधिकारी तडवी यांनी दिले आहे.
रावेर तालुक्यातील अभोडा येथील कादर रुबाब तडवी यांच्या पत्नीचा बचत गटाचा ठेका बंद केल्याची तक्रार कादर तडवी यांनीे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे केली. सीईओंनी आर.आर.तडवी यांच्यासह चर्चा करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर बाहेर निघाल्यावर आर.आर.तडवी यांनी मारहाण केल्याचा आरोप कादीर तडवी यांनी केला.