मनपाच्या केविड केअर सेंटरमध्ये ६७० रुग्णांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:45+5:302021-02-24T04:17:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने आता मनपा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात बंद केलेले ...

Arrangement of 670 patients in Corporation's Kevid Care Center | मनपाच्या केविड केअर सेंटरमध्ये ६७० रुग्णांची व्यवस्था

मनपाच्या केविड केअर सेंटरमध्ये ६७० रुग्णांची व्यवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने आता मनपा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, अभियांत्रिकी महाविद्यालयात हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी महापौर भारती सोनवणे यांनी अचानक भेट देत पाहणी केली. डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा करून महापौरांनी आढावा घेतला. तसेच पूर्वीप्रमाणेच या सेंटरमध्ये रुग्णांना सुविधा देण्याचा सूचना महापौरांनी दिल्या. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये ६७० रुग्णांची व्यवस्था सद्यस्थितीत आहे.

कोविड सेंटरला पाहणी करताना महापौर भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.संजय पाटील, डॉ.विजय घोलप आदींसह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण इमारतींची साफसफाई करून विद्युत दुरुस्ती करण्यात आली असून, सुरक्षा रक्षकांचीदेखील नेमणूक केलेली आहे. महापौरांनी रुग्ण आणि डॉक्टरांशी प्रत्यक्षात चर्चा केली असता कोणत्याही रुग्णाला गंभीर त्रास नसून औषधोपचार सुरू असल्याचे सांगितले.

टप्प्याटप्प्याने सुरू होणार सेंटर

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपाने कोविड सेंटर सुरू केले असून, त्याठिकाणी ६७० रुग्ण उपचार घेतील, अशी व्यवस्था आहे. एका इमारतीमध्ये स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची शक्यतो आरटीपीसीआर चाचणी केली जात असून, एखादा गंभीर रुग्ण असेल तर त्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे. दरम्यान, मनपाकडून टप्प्याटप्प्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. आता महाविद्यालयेदेखील बंद असल्याने रुग्ण वाढल्यास काही महाविद्यालयेदेखील हस्तांतरीत केले जाणार आहेत.

आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावरील उपाययोजनासंदर्भात आमदार सुरेश भोळे यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली, तसेच शहरातील काही रस्त्यालगत व दुकानांमध्ये गर्दी होत असून, त्यासाठी मनपाचे काही पथकं अजून नेमण्याचा सूचना दिल्या आहेत, तसेच कोविड केअर सेंटरमध्येदेखील रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनादेखील आमदार भोळे यांनी दिल्या.

Web Title: Arrangement of 670 patients in Corporation's Kevid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.