ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:25+5:302021-01-14T04:14:25+5:30

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ७२३ ग्रामपंचायतींमध्ये ५ हजार १५४ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी ...

Arrangement of five thousand police for Gram Panchayat elections | ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

Next

जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ७२३ ग्रामपंचायतींमध्ये ५ हजार १५४ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी उपअधीक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली असून, रिंगणात असलेल्या उमेदवारांना कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांमार्फत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सोमवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक घेऊन खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान, मतमोजणीलाही हाच बंदोबस्त कायम राहणार आहे.

कोट....

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी, तसेच कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मतदान व मजमोजणीला कडक बंदोबस्त राहणार आहे.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक

...असा आहे बंदोबस्त

पोलीस उपअधीक्षक : ०८

पोलीस निरीक्षक : १९

सहायक निरीक्षक : ९१

कर्मचारी (पुरुष) : १,४९५

कर्मचारी (महिला) : १८१

होमगार्ड : १,६००

एसआरपी प्लाटून : ०५

दृष्टिक्षेपात

एकूण ग्रामपंचायती : ७२३

एकूण इमारती : १,३३३

एकूण जागा : ५,१५४

एकूण बूथ : २,४१५

Web Title: Arrangement of five thousand police for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.