मोंढाळे येथे लाचखोर विद्युत सहायकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 01:05 PM2017-06-16T13:05:21+5:302017-06-16T13:45:03+5:30

वीज कनेक्शनची कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

The arrest of the bribe power subsidiary at Mondhale | मोंढाळे येथे लाचखोर विद्युत सहायकास अटक

मोंढाळे येथे लाचखोर विद्युत सहायकास अटक

Next

ऑनलाईन लोकमत

पारोळा,दि.16- वीज कनेक्शन संदर्भात तक्रारदार व त्याच्या चुलत भावाविरूद्ध कारवाई टाळण्यासाठी 2600 रूपयांची लाच घेतांना विद्युत सहायक गीतकुमार हरी शिरसाठ (23) यास शुक्रवारी सकाळी मोंढाळे प्र.उ येथील बसस्थानकावर सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदार हे मोंढाळे प्र.उ  येथील पोलीस पाटील आहेत. त्याची मोंढाळे प्र.उ.शिवारात शेती आहे. ते बाजुच्या शेतातील इलेक्ट्रीक पोलवरून वीज घेऊन बाजुच्या विहिरीतून इलेक्ट्रीक मोटारने पाणी भरत होते. विद्युत सहायक गीतकुमार शिरसाठ यांनी तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाच्या शेतात जाऊन, त्यांच्या शेतातील विद्युत खांबावरील वीज कनेक्शनच्या वायरी काढून घेतल्या. वीज कनेक्शन संदर्भात कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार व त्यांचे चुलत भाऊ यांच्याकडून प्रत्येकी 1300 रूपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पंचा समक्ष 2600 रूपयांची लाच स्वीकारतांना गीतकुमार शिरसाठ यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक महेश भोरटेककर, पी.पी.देसले, संदीप सरग, देवेंद्र वेन्द्रे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, आदींनी केली.

Web Title: The arrest of the bribe power subsidiary at Mondhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.