जळगावात वीज अभियंत्याला १२ हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:40 PM2018-06-21T13:40:32+5:302018-06-21T13:40:32+5:30

वीज मीटरचे तुटलेल्या सीलमुळे ४० ते ५० हजाराचा दंड टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे मेहरुण विभागाचे सहायक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (वय ४८, रा.पार्वती नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी मेहरुण परिसरात रंगेहाथ पकडले.

The arrest of a power engineer in Jalgaon for taking a bribe of Rs | जळगावात वीज अभियंत्याला १२ हजारांची लाच घेताना अटक

जळगावात वीज अभियंत्याला १२ हजारांची लाच घेताना अटक

Next
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहरुणमध्ये केली कारवाईवीज मीटरच्या दंडाची रक्कम टाळण्यासाठी घेतली १२ हजाराची लाचसहायक अभियंता संदीप बडगुजर यांनी केला मीटरचा पंचनामा

जळगाव : वीज मीटरचे तुटलेल्या सीलमुळे ४० ते ५० हजाराचा दंड टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे मेहरुण विभागाचे सहायक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (वय ४८, रा.पार्वती नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी मेहरुण परिसरात रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांचे वीज मीटरचे सील तुटलेले होते. महावितरणचे सहायक अभियंता संदीप बडगुजर यांनी या मीटरचा पंचनामा केला होता. त्यानुसार २०१५ पासून आतापर्यंत ४० ते ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे बडगुजर यांनी तक्रारदाराला सांगितले. हा दंड टाळायचा असेल तर १५ हजाराची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याकडे तक्रार केली. ठाकूर यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. पथकाने बुधवारी सायंकाळी मेहरुणमधील एका गोदामाजवळ सापळा लावला. बडगुजर यांना १२ हजार रुपये स्विकारतांना पथकाने रंगेहाथ पकडले.

Web Title: The arrest of a power engineer in Jalgaon for taking a bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.